
कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने देशभरात निर्बंध कमी करण्यात आले. मात्र आता चौथ्या लाटेची चाहूल लागली असून आठवड्याभरामध्ये रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढथ असून गेल्या 24 तासांमध्ये अडीच हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 30 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
देशात गेल्या 24 तासांमध्ये 2541 कोरोना रुग्ण आढळले असून 30 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील संक्रमणाचा दर 0.84 इतका आहे, तर संक्रिय रुग्णांची संध्या 16 हजार 522 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1862 जणांनी कोरोनावर मात केल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
India reports 2,541 new COVID19 cases today; Active cases rise to 16,522
The daily positivity rate stands at 0.84% pic.twitter.com/xApkDrfKrK
— ANI (@ANI) April 25, 2022
दिल्लीत कोरोनाचा हैदोस सुरु
देशात कोरोना वेगाने वाढत असून यामुळे राजधानीत चिंता वाढली आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांमध्ये 1083 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर एकाचा मृत्यू झाला. सध्या दिल्लीमध्ये 3975 सक्रिय रुग्ण असून संक्रमणाचा वेग 4.48 टक्क्यांवर गेला आहे.
केंद्र सरकार सतर्क
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण महामारीच्या धोक्याची माहिती देणार आहेत.
देशातील कोरोना आकडेवारी
एकूण प्रकरणं – 4 कोटी 30 लाख 60 हजार 86
सक्रिय रुग्ण – 16 हजार 522
एकूण बरे झालेले रुग्ण – 4 कोटी 25 लाख 21 हजार 341
एकूण मृत्यू – 5 लाख 22 हजार 223
एकूण लसीकरण – 187 कोटी 71 लाख 95 हजार 781




























































