आता ’मोज’कर करा मौज; नवा व्हिडीओ ऍप लाँच

213

हिंदुस्थानात टिकटॉकवर बंदी आल्यानंतर त्याची जागा घ्यायला नवनवीन ऍप समोर येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘शेअरचॅट’ने असेच एक नवीन ऍप मोज (MoJ) लाँच केले आहे. तीन दिवसांपूर्वी आलेल्या या ऍपला अल्पावधीत 50 हजारांहून अधिक युजर्सनी डाऊनलोड केले आहे.

’मोज’ ऍप गुगल स्टोअरवर उपलब्ध आहे. त्याचे फिचर अगदी टिकटॉकसारखेच आहेत. यामध्ये युजर्सला स्वत:चे शॉर्ट व्हिडीओ तयार करता येतात. तसेच दुसऱयांचे व्हिडीओदेखील बघता येतात. युजर्स 15 सेकंदांचे लहान व्हिडीओ फिल्टरद्वारे बनवू शकतात. तसेच अपलोड करू शकतात. यामध्ये लिप-सिविंग फीचरदेखील आहे. सध्या मोज ऍप हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि पंजाबीसह 15 भाषांना सपोर्ट करते. हे स्कदेशी ऍप इंग्रजी सपोर्ट करत नाही. यामध्ये युजर्सला डान्स, कॉमेडी, क्हीलॉग, फूड, मनोरंजन, बातम्या, गाणी, शायरी, मजेशीर व्हिडीओ यासारखा कंटेण्ट मिळू शकेल. गेल्या काही दिवसांत स्कदेशी चिंगारी आणि रोपोसो हे शॉर्ट व्हिडीओ ऍप हेदेखील खूप लोकप्रिय झाले आहेत. ‘मिटरॉन’ या अन्य एका अॅपनेही एक कोटीचा टप्पा गाठला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या