…अन्यथा हिंदुस्थानी संघाचा 4-0 असा धुव्वा उडेल, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्पचा माइंडगेम

ऑस्ट्रेलिया-हिंदुस्थान यांच्यामध्ये 27 नोव्हेंबरपासून क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच अपेक्षेप्रमाणे माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी माइंडगेमला सुरुवात केलीय. ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्प यावेळी म्हणालाय, विराट कोहलीने वन डे व टी-20 मालिकेत हिंदुस्थानसाठी चांगली कामगिरी केली नाही तर कसोटी मालिकेत टीम इंडियाचा 4-0 अशा फरकाने धुव्वा उडेल.

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरुवातीला वन डे व टी-20 मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये हिंदुस्थानने विजय मिळवायला हवा. असे झाले नाही तर कसोटी मालिकेत दारुण पराभवाला त्यांना सामोरे जावे लागेल. त्यानंतर पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. उर्वरित तीन लढतींमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा कस लागेल हे निश्चित, असेही मायकेल क्लार्पला वाटते.

बुमराह सर्वोत्तम

मायकेल क्लार्पने कर्णधार विराट कोहलीसोबतच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचेही काwतुक केले. पुढे तो म्हणाला, जसप्रीत बुमराह हा वन डे व टी-20 क्रिकेटमधील सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्येही त्याने आपला ठसा उमटवलाय. डेव्हिड वॉर्नरला त्याने अनेक वेळा बाद केले आहे. जोफ्रा आर्चरप्रमाणे त्याने स्टीवन स्मिथला बाऊन्सरवर सतवले आहे. त्यामुळे विराट कोहली व जसप्रीत बुमराहची आक्रमकता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दबावाखाली आणू शकते, असे तो यावेळी म्हणाला.

अॅडलेड डे-नाईट कसोटी, नियोजित वेळापत्रकानुसार होणार

दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 17 डिसेंबरपासून अॅडलेड येथे खेळवण्यात येणाऱया डे-नाईट कसोटीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रभारी सीईओ निक हॉकले यांनी अॅडलेड येथील डे-नाईट कसोटी नियोजित वेळापत्रकानुसार पार पडेल असे मंगळवारी स्पष्ट करीत सर्व शंकापुशकांना पूर्णविराम दिला.

आपली प्रतिक्रिया द्या