Yashasvi Jaiswal – यशस्वी जैस्वालची स्फोटक फलंदाजी, एका फटक्यात मोडला सेहवाग आणि रोहितचा विक्रम

यशस्वी जैस्वालने हैदराबादमधील पहिल्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला असून या बाबतीत त्याने हिंदुस्थानच्या दिग्गज सलामीवीरांनाही मागे टाकले आहे. यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात स्फोटक फलंदाजी करत 74 चेंडूत 80 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार खेचले. आपल्या झंझावाती फलंदाजीमुळे यशस्वी जैसवालने वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्माचा विक्रमही मोडला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सलामीला उतरलेल्या यशस्वी जैस्वालने इंग्लिश गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवत धावा चोपून काढल्या.पहिल्या 4 षटकात त्याने 27 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने हिंदुस्थानी संघासाठी कसोटी डावातील पहिल्या चार षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

ICC Awards 2023 – हिंदुस्थानचा दबदबा, पाकिस्तानला ठेंगा; पहा संपूर्ण यादी

यशस्वी जैस्वालच्या आधी वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी कसोटी डावाच्या पहिल्या चार षटकात 25-25 धावा केल्या होत्या. सेहवागने 2010 साली श्रीलंकेविरुद्ध तर रोहितने 2023 साली वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)