सूर्यकुमारसह मुंबईच्या चार क्रिकेटपटूंना टीम इंडियाचे तिकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल हिंदुस्थानी सीनियर निवड समितीने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या टी-20 संघाची घोषणा केली. मुंबईच्या सूर्यकुमार यादवची 12 मार्चपासून सुरू होणाऱया पाच सामन्यांच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. रिषभ पंत, इशान किशन या यष्टिरक्षकांनाही टीम इंडियाच्या टी-20 संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱया वरुण चक्रवर्ती व राहुल तेवतिया यांनाही हिंदुस्थानी संघाचे तिकीट बुक करता आले आहे. दुखापतीमधून बरा झालेल्या भुवनेश्वरकुमारनेही टीम इंडियाच्या संघात कमबॅक केले आहे.

हिंदुस्थानचा संघ खालीलप्रमाणे

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांडय़ा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वरकुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दूल ठापूर.

हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली लढत – 12 मार्च
  • दुसरी लढत – 14 मार्च
  • तिसरी लढत – 16 मार्च
  • चौथी लढत – 18 मार्च
  • पाचवी लढत – 20 मार्च

    (टीप – सर्व लढती अहमदाबाद येथे होतील.)