कोरोनाची ‘विकेट’, हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिकेतील सामने रद्द, बीसीसीआयची घोषणा

803

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणारी तीन सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली आहे. धर्मशाळा येथे होणारा पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यानंतर, आता लखनौ आणि कोलकाता येथे होणारा दुसरा व तिसरा सामना कोरोना या साथीच्या रोगामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिला सामना 12 मार्चला धर्मशाळा येथे रंगणार होता. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे या लढतीचे फक्त 40 टक्के तिकीटविक्री झाली होती. तसेच पावसाने खेळ केल्याने हा सामना रद्द करावा लागला होता. मालिकेतील दुसरा सामना रविवारी 15 मार्चला लखौ आणि तिसरा सामना 18 मार्चला कोलकाता येथे होणार होता. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता हे सामने रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.

याआधी शुक्रवारी सकाळी इंडियन प्रीमिअर लिग अर्थात आयपीएल स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला होता. आयपीएल स्पर्धा आता 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या