
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
हिंदुस्थानच्या नेमबाजांनी आशियाई एअर गन चॅम्पियनशिपमधील शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधत पदकांची सिल्व्हर ज्युबिली साजरी केली. हिंदुस्थानच्या नेमबाजांनी या स्पर्धेत 16 सुवर्ण, पाच रौप्य व चार कास्य पदकांवर मोहोर उमटवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यश वर्धन व श्रेया अग्रवाल हिने स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी हिंदुस्थानला गोल्ड मेडल जिंकून दिले. यश वर्धनने पुरुषांच्या ज्युनियर गटातील 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदकावर निशाणा साधला. श्रेया अग्रवालने महिलांच्या ज्युनियर गटात गोल्ड मेडल जिंकले.



























































