
महाराष्ट्रातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावर अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्यातील यशवंतराव चव्हाण अॅकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात यशदा या संस्थेचे अतिरिक्त महासंचालक सचिंद्र प्रताप सिंग यांची पुणे येथील भूमी अभिलेख विभागात संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर यशदाच्या उपमहासंचालक पदावर पी. शिव शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोंदियातील देवरी उपविभागाचे साहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांची आयटीडीपी, डहाणू येथे प्रकल्प अधिकारी म्हणून तसेच डहाणू उपविभागाचे साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.





























































