
जम्मू-कश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले. यात वैमानिक सुखरूप असून त्याला थोडी दुखापत झाली आहे, अशी माहिती लष्कराने दिली. याआधी मार्च महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टरही कोसळले होते. मंडला टेकडी परिसरात हिंदुस्थानी लष्कराचे एव्हिएशन चिता हेलिकॉप्टर कोसळून दोन पायलट शहीद झाले होते.

























































