
सामना ऑनलाईन । चंदीगड
पाकिस्तानला हिंदुस्थानी लष्कराची गोपनीय माहिती पुरवणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. शेख रियाझुद्दीन असे या जवानाचे नाक असून त्याच्या विरोधात बीएसएफच्या 29 क्या बटालियनच्या कमांडंटने फिरोजपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदकिली होती.
मूळचा महाराष्ट्रातील लातूरचा असलेला शेख रियाझुद्दीन हा गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसोबत संपर्कात होता. शेखच्या वागण्यावर त्याच्या बटालियनमधील काहीजणांना संशय आला होता. त्यामुळे कमांडंट शेखवर पाळत ठेवून होते. शेख पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याच्या रूमवर छापा मारला असता तिथून पोलिसांनी दोन मोबाईल फोन व सात कार्ड जप्त केले. या फोनवरून फेसबुक मेसेंजरने शेख हिंदुस्थानी लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानला पोहचवत होता.
summary- indian army man got arrested for disloyalty




























































