
सामना ऑनलाईन, बर्लिन
त्रिशा देब, ज्योती सुरेखा आणि मुस्कान किरार या हिंदुस्थानच्या महिला त्रिकुटाने जर्मनीच्या बर्लिन शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंड गटात रुपेरी यश संपादन केले. अंतिम फेरीत हिंदुस्थानी संघाला फ्रान्सच्या संघाकडून २२९-२२८ असा एका गुणाच्या फरकामुळे निसटता पराभव स्कीकारावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाचव्या मानांकित हिंदुस्थानच्या महिला संघाने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित तुर्कीच्या संघावर २३१-२२८ असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक दिली होती. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत हिंदुस्थानने इंग्लंडच्या महिलांवर मात केली होती. त्यानंतर झालेल्या दुसर्या सामन्यात हिंदुस्थानने अमेरिकेचे आव्हान मोडून काढले.
मिश्र गटात कांस्यपदक
दरम्यान, मिश्र गटात अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा या जोडीने हिंदुस्थानला कांस्यपदक जिंकून दिले. त्यांनी टर्कीच्या जोडीवर १५६-१५३ असा विजय मिळवला.



























































