एका दिवसाची इंटर्नशिप करा….अन् मिळवा लाखो रुपये! ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील एका लोकप्रिय फूड प्रोडक्ट कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक अप्रतिम इंटर्नशिप ऑफर जाहीर केली आहे. याचा लाभ घेणारे ग्राहकाला एका दिवसात लाखो रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे. ही इंटर्नशिप ऑफर फक्त एक दिवसासाठी असणार आहे.

प्रसिद्ध फूड प्रोडक्ट कंपनी Britannia Treat Croissant ने ही इंटर्नशिप ऑफर दिली आहे. ही इंटर्नशिप करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीला ऑफिसमध्ये एक दिवस काम करण्यासाठी तब्बल 3 लाख रुपये दिले जातील. या एक दिवसात तुम्हाला फ्रेंच पेस्ट्री क्रोइसंटचे नाव अचूकपणे उच्चारायला शिकावे लागेल. मग तुम्हाला कंपनीतर्फे याचे तब्बल 3 लाख रुपये मिळणार आहेत. तुम्हालाही सहज पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

कोण अर्ज करू शकतो?

अर्जदात्याचे वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही या इंटर्नशिप संधीसाठी अर्ज करू शकता. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला कंपनीच्या व्हॉट्सॲप चॅनलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी लिंक तुम्हाला Britannia Crossan च्या Instagram बायोमध्ये आढळेल. नोंदणी करताना तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, त्यानंतर तुम्हाला कंपनीचे इन्स्टाग्राम पेज फॉलो करावे लागेल आणि त्यावर 2 टास्क पूर्ण करावे लागतील. तुम्हाला यात सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही 10 मार्चपर्यंत नोंदणी करू शकता.