T20 WC 2026 – सेमीफायनलआधी टीम इंडियाचे खेळाडू सिद्धिविनायकाच्या चरणी; विजयासाठी साकडं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 ची दुसरी सेमीफायनल लढत हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळली जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला. 5 मार्च रोजी वानखेडे मैदानावर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या हाय-व्होल्टेज लढतीपूर्वी सलामीवीर ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि हिंदुस्थानच्या विजयासाठी बाप्पाला साकडे घातले.

सिद्धिविनायक मंदिरात या तिन्ही खेळाडूंनी पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली. सध्या हे तिन्ही खेळाडू हिंदुस्थानी संघाचे कणा मानले जात आहेत. ईशान किशन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तर अष्टपैलू अक्षर पटेलची कामगिरीही निर्णायक ठरत आहे. अभिषेक शर्माच्या फॉर्ममध्ये चढ-उतार पाहायला मिळत असले, तरी या मोठ्या सामन्यात तो चमकण्याची आशा चाहत्यांना आहे.

T20 WC 2026 – वानखेडेवर घुमणार ‘मुंबई इंडियन्स’चा गजर; इंग्लंडला नमवण्यासाठी चारचौघे सज्ज

दरम्यान, याआधीही वर्ल्डकप सुरुवातीला कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. तसेच, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-8 सामन्यापूर्वी अक्षर पटेल, अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव पत्नी कोलकाता येथील प्रसिद्ध कालीघाट काली मंदिरात नतमस्तक झाले होते.

न्यूझीलंडपुढे द. आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचे आव्हान; दोन तुल्यबळ संघांमध्ये आज रंगणार पहिला उपांत्य सामना