भारतीय विमा संस्था स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि महासंघ सरचिटणीस, शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांच्या संमतीने भारतीय विमा संस्था स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

अध्यक्ष- मनीष रायकर, कार्याध्यक्ष- सतीश शिंदे, सरचिटणीस- शशिकांत भुवड, चिटणीस- अर्चना सावंत, समीर बांदिवडेकर, कोषाध्यक्ष- मृणाल साटम, सहकोष्याध्यक्ष- विशाल नावडकर, महिला आघाडी प्रमुख- लक्ष्मी जोशी, कार्यालयप्रमुख- सीमा तेटांबे.