
हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात शनिवारी हायटेक पाणबुडी आयएनएस खंदेरी दाखल होणार आहे. हिंदुस्थानच्या शत्रूंना धडकी भरवणाऱ्या अशा या अत्याधुनिक पाणबुडीची चाचणी गुरुवारी मुंबईच्या समुद्रात घेण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आयएनएस खंदेरीला हिंदुस्थानी नौदलात सामील करण्याचा सोहळा पार पडणार आहे.




























































