इंडियन ओव्हरसीज बँकेत 400 पदांसाठी भरती

इंडियन ओव्हरसीज बँकेने स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या 400 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती देशातील वेगवेगळ्या राज्यात केली जाणार असून या भरती अंतर्गत महाराष्ट्रात 45 पदे, तामिळनाडूत 260 पदे, ओडिशात 10 पदे, गुजरातमध्ये 30 पदे, पंजाबमध्ये 21 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 आहे. उमेदवाराचे वय किमान 20 ते जास्तीत जास्त 30 वर्षे असायला हवे. भरती संबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाईट iob.in वर देण्यात आली आहे.