आता रेल्वेत व्हॉट्सअ‍ॅपनेही ऑर्डर करता येणार जेवण: रेल्वेने जारी केला क्रमांक

 रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. यात आता आणखी एका नव्या सेवेची भर पडली आहे. रेल्वेने मंगळवारी व्हॉट्सअ‍ॅप फूड डिलिव्हरी यंत्रणेचा शुभारंभ केला. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आपल्या PNR नंबरचा वापर करावा लागेल. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, हिंदुस्थानी  रेल्वेने आपल्या ग्राहकांसाठी ई-केटरिंग सर्व्हिस अधिक लाभदायी बनवण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे. यासाठी एक विशेष बिझनेस व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांना 8750001323 या क्रमांकावर फूड ऑर्डर करता येईल.

हिंदुस्थानी  रेल्वेच्या PSU, IRCTC ने यासाठी एक विशेष वेबसाइट तयार केली आहे. रेल्वेने www.ecatering.irctc.co.in सोबत स्वतःची ई-केटरिंग अप फूड ऑन ट्रॅकच्या माध्यमातूनही ई-केटरिंग सेवा सुरू केली आहे.

 रेल्वेने प्रारंभी व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिकेशनच्या माध्यमातून ई-केटरिंग सेवेची 2 फेजची योजना सुरू केली होती. पहिल्या टप्प्यात ग्राहकांना ई-तिकिट बूक केलेल्या क्रमांकावर मेसेज पाठवला जाईल. या मेसेजमध्ये त्यांना एक लिंक www.ecatering.irctc.co.in पाठवली जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर प्रवाशांना ई-केटरिंगची सुविधा निवडता येईल. या पर्यायाद्वारे प्रवाशांना स्टेशनवर उपलब्ध आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवता येईल. यासाठी प्रवाशांना कोणतेही वेगळे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही.

दुसऱ्या टप्प्यात ग्राहकांना प्रश्नोत्तरेही करता येणार

सेवेच्या दुसऱ्या टप्प्यात व्हॉट्सअ‍ॅप कस्टमर्सना AI Power chatच्या माध्यमातून ई-केटरिंग सेवेसंबंधी प्रश्नोत्तरेही करता येतील. तसेच फूड ऑर्डरही करता येईल. प्रारंभी काही निवडक रेल्वे मार्गांवरच ई-केटरिंगची व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर ग्राहकांची प्रतिक्रिया व शिफारशींच्या आधारावर रेल्वे इतर रेल्वेंतही ही सेवा सुरू करेल.