Indian student attacked us : हिंदुस्थानी तरुणावर अमेरिकेत प्राणघातक हल्ला

अमेरीकेत एका हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर चार लोकांनी हल्ला केला आहे, हल्लेखोराने त्या विद्यार्थ्याचे डोके फोडले आणि त्याचा फोन खेचून घेतला. सध्या या घटनेचा व्हडिओ व्हायरल होत असून तरुणाने कृपया मला मदत करा

पिडीत विद्यार्थ्याचे नाव सैयद मजाहिर अली असे आहे. त्याचे कुटुंब हैदराबाद येथे असते. एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मजाहिर हल्लेखोरापासून जीव वाचण्यासाठी रस्त्यावर धावताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत त्याच्या डोक्यातून रक्त येत असून तो मदतीची हाक मारताना दिसत आहे. सैयद मजाहिर अली याची पत्नी सैयदा रकुलिया फातिमा रिजवी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून मदतीची हाक मारली आहे. ती आपल्या पतीला पाहण्यासाठी अमेरीकेला जाऊ इच्छित आहे. तिने विनंती केली आहे की परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पतीवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करावी.

रुकुलिया फातिमा यांनी पत्रात लिहिले आहे की, “मला अमेरिकेतील शिकागो येथील माझ्या पतीच्या सुरक्षेबद्दल खूप काळजी वाटते. मी तुम्हाला विनंती करते की कृपया त्याला चांगले उपचार मिळण्यास मदत करा. शक्य असल्यास कृपया आवश्यक व्यवस्था करा जेणेकरून मी माझ्या तीन लहान मुलांसह अमेरिकेला जाऊ शकेन आणि माझ्या पतीची काळजी घेऊ शकेन.

मजहिर अली इंडियाना वेस्लेयन विद्यापीठात पदव्युत्तर पदवी घेत आहेत. तीन हल्लेखोर त्याचा पाठलाग करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हल्ल्यानंतर अली म्हणतो, मी घरी परतत असताना चार जणांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला लाथ मारली आणि धक्काबुक्की केली. कृपया मला मदत करा असे त्याने म्हंटले आहे.