
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानातील मुलांमध्ये शाळे व्यतीरीक्त शिकवणी लावण्याचे प्रमाण जगात सर्वात जास्त असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. देशातील 74 टक्के विद्यार्थी शाळेव्यतीरिक्त शीकवणी लावतात. ‘केंब्रिज इंटरनॅशनल ग्लोबल एज्युकेशन सेन्सस’ने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. यासाठी जगभरातिल प्रमुख 10 देशांतील विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश करण्यात आला होता.
जागतीक शिक्षण विषयक केलेल्या सर्वेक्षणात अनेक महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये शाळेव्यतिरिक्त शिकवणी लावण्यात हिंदुस्थानी विद्यार्थी आघाडीवर आहेत, तर चीनमधील विद्यार्थी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या अहवालात मुलांच्या शाळेतील खेळाविषयी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ती म्हणजे 26.1 टक्के मुलं शाळेत तासभर देखील खेळत नाहीत. तर 36.7 टक्के मुलं आठवडाभरात जेमतेम एक तास खेळतात. तसेच फक्त 3 टक्के मुलं ही आठवड्यातून 6 तास खेळतात. या सर्वेक्षणात हिंदुस्थानसह अमेरिका, मलेशिया, दक्षिण अफ्रिका, अर्जेंटीना, चीन, पाकिस्तान अशा 10 देशातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश करण्यात आला होता.


























































