आयसीसीच्या वर्ल्ड कप संघात हिंदुस्थानचा दबदबा, कर्णधारपदी रोहित शर्मा; 6 खेळाडूंची निवड

 

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदाच्या वर्ल्ड कपचे सूप वाजताच वन डे वर्ल्ड कपचा संघ निवडला. वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकला असला तरी या आयसीसीच्या संघात हिंदुस्थानचाच दबदबा दिसतोय. 12पैकी 6 खेळाडू हे हिंदुस्थानी असून या संघाचे कर्णधार पदही रोहित शर्माकडेच सोपविण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाने यंदाच्या वर्ल्ड कपवर मोहोर उमटवली असली तरी आयसीसीच्या वर्ल्ड कप संघात दोनच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. मधल्या फळीतील ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू अॅडम झम्पा यांना या संघात स्थान मिळाले. याचबरोबर सेमी फायनलमध्ये पोहचलेल्या दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू या संघात आहेत. सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि अष्टपैलू खेळाडू गेराल्ड कोएट्झी (12 वा खेळाडू) यांचा समावेश आहे. याचबरोबर न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल आणि श्रीलंकेचा दिलशान मदुशंका यांचादेखील या वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला आहे.

आयसीसीचा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा संघ ः क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका, यष्टिरक्षक), रोहित शर्मा (हिंदुस्थान, कर्णधार), विराट कोहली (हिंदुस्थान), डॅरील मिचेल (न्यूझीलंड), के.एल. राहुल (हिंदुस्थान), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), रवींद्र जाडेजा (हिंदुस्थान), जसप्रीत बुमराह (हिंदुस्थान), दिलशान मदुशंका (श्रीलंका), अॅडम झम्पा (ऑस्ट्रेलिया), मोहम्मद शमी (हिंदुस्थान), गेराल्ड कोएट्झी (द. आफ्रिका, 12वा खेळाडू).