
दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या वैमानिकाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता इंडिगोचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. आताच्या नव्या प्रकरणात महिला प्रवाशाने एअर होस्टेजसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. महिलेने दावा केला आहे की, इंडिगोच्या विमानात एअर हॉस्टेसने तिच्यासोबत गैरवर्तन करत तिचा मोबाईलही हिसकावून घेतला.सोशल मीडियावर इंडिगो एअरलाईन्सविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शक्ती गायत्री नावाच्या युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये व्हिडीओ बनविण्याचा प्रयत्न केल्यावर एअर हॉस्टेसने महिलेचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला आहे. एअर हॉस्टेसने महिलेचा हात पकडला आणि मोबाईल हिसकावण्याचा पूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. शक्ती गायत्रीने एक्सवर पोस्ट करत लिहीले की, इंडिगोच्या एअर ह़ॉस्टेसने व्हिडीओ बनवताना माझा मोबाईल हिसकावला आणि माझ्यावर बळाचा प्रयोग केला. तिने पुढे लिहीले की, माझा मोबाईल हिसकावल्यानंतर एअर हॉस्टेसने पर्सनल फोटो डिलीट केले.
एवढेच नाही यूजरने दावा केला आहे की, एअर हॉस्टेसने तिचा हात पिरगळून मोबाईल लपवला. महिलेच्या म्हणण्यानुसार, आता इंडिगो हा व्हिडीओ डिलीट करणे आणि हे प्रकरण स्वतंत्रपणे मिटवण्याबाबत ते बोलत आहेत. एक्सवर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये महिलेच्या म्हणण्यानुसार, एअर हॉस्टेसविरोधात कारवाई करायला हवी. यांना प्रवाशांवर बळाचा वापर करायला कोणी अधिकार दिला आहे. हा व्हिडीओ 16 डिसेंबर 2023 ला एक्सवर पोस्ट केला होता जो आतपर्यंत व्हायरल होत आहे.
























































