
बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे वाराणसीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. बंगळुरुसाठी उड्डाण घेतल्यानंतर 15 मिनिटांनी विमानाला पक्षी धडकला. पक्षी धडकल्याने विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. विमानात एकूण 216 प्रवासी होते. आपत्कालीन लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
इंडिगोचे 6E-437 विमानाने गोरखपूर विमानतळावरून नियमित वेळेत बंगळुरूसाठी उड्डाण घेतले. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांनी विमानाच्या पुढच्या भागावर पक्षी धडकला. पायलटने तात्काळ वाराणसी एटीएसशी संपर्क साधला. यानंतर वाराणसीतील लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.



























































