विमान उड्डाण करण्याआधी प्रवासी म्हणाला, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह’; वाचा नंतर काय झाले…

indigo

देशात आलेल्या कोरोना संकटानंतर लोक मार्गदर्शक तत्त्वांचे कडक पालन करत आहेत. विशेषत: प्रवासादरम्यान प्रत्येकजण सावधानता बाळगत आहे. अशातच दिल्लीहून पुण्याला विमान उड्डाण करण्याआधी एका प्रवाशाने तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची घोषणा केली. यामुळे विमानात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुण्याकडे इंडिगोचे 6E 286 विमान उड्डाण करणार होते. मात्र त्याचवेळी एका प्रवाशाने सांगितले की तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. या प्रवाशाने प्रवासाआधी कोरोना टेस्ट केली होती. मात्र त्याचा याची रिपोर्ट तो विमानात बसल्यावर त्याला मिळाला.

रिपोर्ट मिळताच या प्रवाशाने याची माहिती विमानाच्या केबिन क्रूला दिली. केबिन क्रूने ही माहिती विमानाच्या पायलटला दिली, त्यानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आणि प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या