
इंडिगो (IndiGo)च्या गोंधळाने हवाई सेवा वापरणाऱ्या प्रवाशांना गेला आठवडाभर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. असंख्य विमानांची उड्डाणे रद्द झाली तर बरीच विमाने नियोजित वेळेपेक्षा उशिराने झाली. अशातच IndiGo कंपनीने अनेक प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत केले आहेत.
रविवारी संध्याकाळी दिलेल्या अहवालानुसार, शनिवारीच्या १५०० विमानांच्या तुलनेत आज १६५० हून अधिक उड्डाणे (Flights) चालवण्याच्या मार्गावर आहे. एअरलाइनने सांगितले की, १३८ पैकी १३७ गंतव्यस्थाने (Destinations) कार्यरत आहेत आणि वेळेवर सेवा देण्याचे प्रमाण (On-time performance) कालच्या ३० टक्क्यांवरून सुधारून ७५ टक्के झाले आहे.
एअरलाइनने पुन्हा सांगितले की, १५ डिसेंबरपर्यंतच्या बुकिंगसाठी रद्द करण्याच्या (Cancellations) आणि वेळापत्रक बदलण्याच्या (Reschedule) विनंत्यांवर पूर्ण सूट दिली जाईल. परतावा (Refunds) आणि सामान (Luggage) क्रमवारीची प्रक्रिया जलद गतीने सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
इंडिगोने आपल्या ताज्या स्टेटस अपडेटमध्ये म्हटले आहे की, ‘सेवा सुरळीत करण्यासाठी आम्ही २४ तास काम करत आहोत. कृपया आम्हाला सहकार्य करा’.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंडिगोच्या (IndiGo) ओपरेशन संकटांमुळे (Operational Crisis) झालेल्या व्यत्ययावर तातडीने आणि निर्णायक पाऊले उचलून नागरिकांना सतत गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation – MoCA) त्वरित उपाययोजना केल्या आहेत.
इतर सर्व देशांतर्गत एअरलाइन्स सुरळीतपणे आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याने देशभरातील हवाई प्रवासाचे कार्य वेगाने सुरळीत करण्यावर भर असल्याचे सांगण्यात येत आहे. आज इंडिगोच्या (IndiGo) कामगिरीमध्येही लक्षणीय सुधारणा दिसून आली असून, विमानांचे वेळापत्रक सामान्य स्तराकडे परतत असल्याचे त्यांनी सांगितले.
जास्त शुल्क आकारणी रोखण्यासाठी हवाई भाडे नियमन
अलीकडील रद्द झालेल्या उड्डाणांमुळे मागणीत बदल झाला आणि हवाई भाड्यांमध्ये (Airfares) तात्पुरती वाढ झाली. ही बाब लक्षात घेऊन मंत्रालयाने हस्तक्षेप करत तातडीने हवाई भाड्यांवर कमाल मर्यादा (Cap) लागू केली. यामुळे प्रवाशांसाठी वाजवीपणा (Fairness) आणि परवडण्याजोगी किंमत (Affordability) निश्चित झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा आदेश लागू झाल्यापासून, प्रभावित मार्गांवरील भाड्याची पातळी स्वीकार्य मर्यादेपर्यंत नियंत्रित झाली आहे. सर्व एअरलाइन्सना सुधारित भाडे संरचनेचे (Revised Fare Structure) काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्रवाशांना परतावा आणि वेळापत्रक बदलासाठी मदत
प्रवाशांच्या आर्थिक संरक्षणाची (Financial Protection) खात्री करण्यासाठी, मंत्रालयाने इंडिगोला कठोर निर्देश दिले आहेत की रद्द झालेल्या किंवा खूप विलंब झालेल्या विमानांचे सर्व परतावे आज रात्री ८ वाजेपर्यंत पूर्ण करावेत. इंडिगोने आतापर्यंत एकूण ६१० कोटी रुपयांच्या परताव्यावर प्रक्रिया केली आहे.
रद्द झालेल्या विमानांमुळे प्रवासात परिणाम झालेल्या प्रवाशांना वेळापत्रक बदलण्यासाठी (Rescheduling) कोणतेही अतिरिक्त शुल्क (Additional Fees) आकारले जाणार नाही. परतावा आणि पुनर्बुकिंगचे प्रश्न विनाविलंब किंवा गैरसोयीशिवाय सोडवले जावेत यासाठी प्रवाशांना सक्रियपणे मदत करण्यासाठी विशेष समर्थन कक्ष (Dedicated Support Cells) तयार करण्यात आले आहेत.
सामानाचे जुळवणी आणि वितरण (Baggage Reconciliation And Delivery)
मंत्रालयाने इंडिगोला निर्देश दिले आहेत की, विमानातील व्यत्ययांमुळे प्रवाशांपासून वेगळे झालेले सर्व सामान ४८ तासांच्या आत शोधून प्रवाशांना परत करावे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सतत संवाद ठेवणे अनिवार्य आहे. या दबावामुळे, इंडिगोने कालपर्यंत देशभरातील प्रवाशांना ३,००० सामानाचे तुकडे (pieces of baggage) यशस्वीरित्या वितरित केले आहेत.
विमानतळ कार्य आणि ऑन-ग्राउंड सुविधा
दिल्ली, मुंबई, बंगळूरू, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद आणि गोवा येथील विमानतळ संचालकांनी (Airport Directors) आज टर्मिनलवर सामान्य परिस्थिती असल्याचे पुष्टी केली आहे. चेक-इन, सुरक्षा किंवा बोर्डिंग पॉईंट्सवर कोणतीही गर्दी नसून प्रवाशांची हालचाल सुरळीत सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमानतळ ऑपरेटर आणि सीआयएसएफने (CISF) वर्धित निरीक्षण (Enhanced Monitoring) आणि वेळेवर मदत तैनात करून ऑन-ग्राउंड समर्थन मजबूत केले आहे.
रिअल-टाईम मॉनिटरिंग आणि नियंत्रण उपाय
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे (MoCA) २४x७ नियंत्रण कक्ष (Control Room) एकात्मिक समन्वय केंद्र (Integrated Coordination Hub) म्हणून कार्यरत आहे, जे विमान कार्यान्वयन, विमानतळ परिस्थिती आणि प्रवाशांच्या मदतीची आवश्यकता यावर देखरेख ठेवत आहे. प्रवाशांच्या कॉलला त्वरित उपस्थिती लावली जात आहे आणि आवश्यकतेनुसार मदत पुरवली जात आहे. कार्यान्वयन नियोजन, क्रू रोस्टरिंग आणि प्रवासी हाताळणी मानकांचे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी आमचे पथक जमिनीवर तैनात आहेत.
प्रवाशांना आश्वासन
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवास करणाऱ्या जनतेला (Travelling Public) आश्वासन दिले आहे की, प्रवाशांची सुरक्षा, सोय आणि सन्मान हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. विमान वाहतूक नेटवर्क पूर्णपणे सामान्यतेकडे वेगाने वाटचाल करत आहे आणि कार्ये पूर्णपणे स्थिर होईपर्यंत सर्व सुधारात्मक उपाययोजना (Corrective measures) कायम राहतील, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
प्रवाशांच्या हक्कांचे आणि हिताचे पूर्ण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालय सतत बारकाईने लक्ष ठेवील आणि आवश्यकतेनुसार पुढील अपडेट शेअर केली जातील.






























































