हिंदु्स्थानच्या हवाई दलाची गरुड भरारी; फ्रान्ससोबत संयुक्तरित्या अभ्यास करणार

Indo French Joint Exercise Garuda

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या हवाई दलाची एक तुकडी आर्मी डी I’Air (फ्रान्सचे हवाई दल) सोबत एकत्र अभ्यास करण्यासाठी फ्रान्सला रवाना झाली आहे. दोन्ही हवाई दलाच्या संयुक्त अभ्यास करण्याचा या कार्यक्रमाला गरुड म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे संयुक्त अभ्यास करण्याचा ही सहावी वेळ आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा अभ्यास केला जाईल.

दोन्ही देशाच्या हवाई दलाने एकत्र अभ्यास करण्याच्या या कार्यक्रमाची सुरुवात ही 2003 मध्ये सुरू झाली होती. याचा पहिला अभ्यास हा हवाई दलाच्या ग्वालियर तळावर करण्यात आला होता. दोन्ही देशातील हवाई दलाच्या प्रशिक्षण पद्धतींची ओळख होणे आणि ती पद्धत कशा प्रकारे प्रत्यक्षात अंमलात आणण्यात येते हे जाणून घेणे हा या मागिल प्रमुख उद्देश आहे. ज्यामुळे भविष्या दोन्ही देशातील सहकार्य वाढवण्यात अधिक मदत मिळते. युद्ध परिस्थिती आणि अन्य विविध प्रकारच्या परिस्थितीत हवाई दल कशाप्रकारे महत्वाची भूमिका निभाऊ शकतो यासाठीच्या विविध पद्धती एकत्रितरित्या अभ्यासल्या जातील.

यंदा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हवाई दलाकडून 24 स्क्वाड्रनला (हॉक्स) सहभागी करण्यात आले आहे, जो या अभ्यास शिबिरात सुखोई (Su-30 MKI) लढाऊ विमानांचे संचलन करत आहे. गेल्या दशकात हवाई दलाने अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया यांच्या हवाई दलांसोबत संयुक्त अभ्यास शिबिर केले आहे.