
इंडोनिशिया येथे झालेल्या ‘आशिया श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये हिंदुस्थानच्या चित्रेश नटेशन याने चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. हिंदुस्थानच्या खेळाडूंनी या स्पर्धेत आठ सुवर्ण, सहा रौप्य व आठ कास्य पदकावर मोहोर उमटवली. या स्पर्धेत हिंदुस्थानने उपविजेतेपद पटकावले. कुंदन गोपे (55 किलो, भारतीय रेल्वे), हरी बाबू (70 किलो, इंडियन रेल्वे), वि. जयप्रकाश (75 किलो, इंडियन रेल्वे), सरबो सिंग (80 किलो, इंडियन रेल्वे ), चित्रेश नटेशन (90 किलो, केरळ), रोहित शेट्टी (100 किलो, महाराष्ट्र ) यांनी सुवर्ण पदक पटकावताना देशासाठी मोलाची कामगिरी केली. तर दिव्यांग स्पर्धेमध्ये श्याम सिंग शेरा (पंजाब) याने सुवर्ण पदक मिळवले.





























































