
सामना ऑनलाईन । जकार्ता
इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी हिंदुस्थानला कही खुशी कही गममधून जावे लागले. एकीकडे गतविजेत्या किदाम्बि श्रीकांतला पुरुष एकेरीत हार सहन करावी लागली तर पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत विजय मिळवू आगेकूच केली.
केण्टो मोमोटाने किदाम्बि श्रीकांतचे कडवे आव्हान १२-२१, २१-१४, २१-१५ असे मोडून काढले. तसेच पी. व्ही. सिंधूने पोर्न चोचुवोगला २१-१५, १९-२१, २१-१३ असे पराभूत केले. याचसह मनू अत्री-सुमित रेड्डी यांना दुहेरीत, प्रणव चोप्रा – सिक्की रेड्डी यांना दुहेरीत आणि वैष्णवी रेड्डीला एकेरीत पराभवाचा सामना करावा लागला.





























































