इंदुरीकर महाराजांची बदनामी; पुणे सायबर सेलकडे गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indurikar-maharaj

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची बदनामी करणारे व्हिडीओ ‘यू टय़ूब’सह इतर सोशल मीडियावर पोस्ट करणाऱयांविरोधात पुणे सायबर सेलकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराजांचे वकील पांडुरंग शिवलीकर यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी इंदुरीकर महाराजांना नोटीस बजावली आहे.

…तर कीर्तन सोडून शेती करेन!
शुक्रवारी बीड येथील कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. ‘मी जे बोललो ते चुकीचे नाही. मी बोलल्याचे अनेक ग्रंथांमध्ये नमूद केले आहे’ असा दावा करीत ‘या सर्व प्रकरणाचा मला त्रास होत असून एक-दोन दिवस बघेन नाही तर कीर्तन सोडून शेती करेन’.