ऑस्ट्रेलियाचा दौरा म्हणजे विंडीजला मरणासाठी पाठवणे

वेस्ट इंडीजचा दुबळा आणि अनुभवहीन संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. हा दौरा म्हणजे बकऱयांना मरण्यासाठी पाठवण्यासारखेच असल्याची टीका वेस्ट इंडीजचा महान यष्टिरक्षक जेफ दुजानने केली. ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी वेस्ट इंडीजकडे कसोटी खेळलेले चार खेळाडूच संघात आहेत. जेसन होल्डर आणि कायल मायर्स टी-20 लीग खेळत आहेत. 15 जणांच्या कसोटी संघात 7 खेळाडू एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत आणि उर्वरित आठ फक्त नावाला कसोटी खेळले आहेत. वेस्ट इंडीजकडेही चांगले खेळाडू आहेत, पण कुणालाही देशासाठी खेळायचे नाहीय.