भरधाव इनोव्हा कार उलटून एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुत्रे आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटून इनोव्हा कार उलटल्याची घटना आष्टी-पंढरपूर रस्त्यावर घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे.

आत्माराम नाथा पोटवडे (वय 35, रा. मावळ, जि. पुणे) असे मृताचे नाव आहे, तर प्रज्वल रामदास गिरीगोसावी (वय 22, रा. खरपोडा, ता. खेड, जि. पुणे) हा जखमी झाला आहे.

आष्टी-पंढरपूर रस्त्यावरील कदम वस्तीजवळ भरधाव इनोव्हाला अचानक कुत्रे आडवे आले. कुत्र्याला वाचविण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटून कार बाजूच्या खड्डय़ात उलटली. यात पोटवडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक प्रज्वल हा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.