
इंस्टाग्रामने गुरुवारी जाहीर केले की यूझर्स 18 वर्षांचे आहेत हे निश्चित करण्यासाठी ते अमेरिकेत नवीन पर्यायांची चाचणी करत आहेत.
विविध देशांच्या संसदेत सोशल मीडियासंदर्भात चिंता आणि चर्चा होतात. तसेच पालकांच्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी, Instagram आता यूझर्सना त्यांचे वय किमान 18 किंवा 18 पेक्षा जास्त असल्याचा वेगळा पुरावा मागू शकेल. एकतर फोटो आयडी अपलोड करून, व्हिडीओ सेल्फी रेकॉर्ड करून किंवा परस्पर मित्रांना त्यांच्या वयाबद्दल पुष्टी करण्यास सांगू शकतो.
सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य हा विषय कायम चर्चेत आहे. त्यानर उपाय म्हणून इन्स्टाग्रामचा वापर करणाऱ्या तरुण यूझर्सच्या वयाची कठोर तपासणी केली जाते. अनेक सूचना आणि तक्रारींनंतर कंपनीने फॅमिली सेंटर सारख्या पालकांच्या नियंत्रणासाठी आणखी साधने आणली.
फेसबुकची पॅरंट कंपनी मेटाच्या मालकीच्या Instagram ने सांगितले की ते लंडनस्थित Yoti या कंपनीला व्हिडिओ सेल्फी पाठवतील जे चेहर्यावरील वैशिष्ट्यांवर आधारित वयाचा अंदाज लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. मेटा म्हणाले की तंत्रज्ञान वय वगळता इतर कोणतीही ओळख करू शकणार नाही.
वयाची पुष्टी झाल्यानंतर Yoti आणि Meta व्हिडीओ सेल्फी हटवतील, असे कंपनीने म्हटले आहे.
Instagram वर साइन अप करताना लोकांना त्यांचे वय प्रदान करणे आवश्यक आहे. साइन अप करण्यासाठी किमान वय 13 वर्षे आहे.
‘एखाद्याचे वय ऑनलाइन समजून घेणे हे एक अत्यंत जटिल, खूप वेळ खाणारी आव्हानात्मक प्रक्रिया आहे. वयाच्या ऑनलाइन पडताळणीसाठी स्पष्ट मानके सेट करण्यासाठी आम्हाला आमच्या उद्योगातील इतरांसोबत आणि सरकारांसोबत काम करायचे आहे,’ असे मेटाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.





























































