इन्स्टाग्रामवर लवकरच ‘टेक्स्ट टू स्पीच’ फीचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामवर रील बनवण्यासाठी व्हॉईस आणि ऑडिओचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. हेच पाहता इन्स्टाग्राम नवे ऑडिओ व्हॉईस इफेक्ट आणि टेक्स्ट-टू-स्पीच हे फीचर लाँच करणार आहे. आयओएस आणि अॅण्ड्रॉईड युजर्ससाठी इन्स्टाग्रामवर हे नवीन फीचर रोलआउट केले जाणार आहे. टेक्स्ट-टू-स्पीचद्वारे युजर्सला व्हिडीओमध्ये आपल्या आवाजाचा उपयोग करण्याची सुविधा मिळेल. तर व्हॉईस इफेक्ट या नव्या फीचरमुळे आता वेगवेगळय़ा आवाजांसह व्हिडीओ बनवणे शक्य होणार आहे.