आंतरशालेय हॉकी स्पर्धा – डॉन बॉस्कोने मारली बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंतिम फेरीत परंपरागत प्रतिस्पर्धी सेंट स्टॅनिस्लास, वांद्रे स्कूलचा 4-0 असा धुव्वा उडवत डॉन बॉस्को, माटुंगा स्कूलने सेंट पीटर्स हॉकी आंतरशालेय स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले गटाचे जेतेपद पटकावले.

सेंट पीटर्स युथ सेंटर आयोजित सेंट स्टॅनिस्लास हायस्कूल मैदानावर झालेल्या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले गटाच्या अंतिम फेरीत सुहान पवळे (2 गोल) हा डॉन बॉस्कोच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. रिषी जठाना आणि शंतनू म्हात्रे यांनी प्रत्येकी एक गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.
पुरुष वयस्कर गटात मुंबई राजे क्लब विजेता ठरला.

अंतिम फेरीत त्यांनी सी ह्यू एससीचा 5-1 अशा फरकाने पराभव केला. मेघराज मूर्ती याची गोल हॅटट्रिक त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. ऑलिम्पियन गॅविन फेरिरा आणि न्यूमॅन डिसोझाने प्रत्येकी एक गोल करत त्याला सुरेख साथ दिली. प्रतिस्पर्धी क्लबकडून एकमेव गोल जी. पिल्लई याने केला.