नदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला!, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध

नदीत हरवलेला आयफोन एका महिलेला तब्बल आठ महिन्यांनी मिळाला आहे. या फोनसोबत असलेल्या एका फोटोच्या आधारे मच्छीमाराने फेसबुकवरून या महिलेचा शोध घेऊन हा फोन तिच्या स्वाधीन केला आहे. आठ महिन्यांनी आपला फोन पाहून महिलादेखील भलतीच खूश झाली आहे.

साऊथ क@रोलिया येथील ही घटना आहे. जेसन रॉबिन्सन वेकामाव नदीत मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करताना त्यांच्या फिशिंग रॉडमध्ये चक्क आयफोन सापडला. रॉबिन्सनने काही वेळाने फोनला लागलेला चिखल साफ केला. त्या वेळी त्यांना  फोनसोबत एक फोटो सापडला, ज्यात एका तरुणीने तरुणाला उचलल्याचे दिसत होते. त्यांनी या फोटोद्वारे कपलला शोधण्यासाठी फेसबुकवर फोटो पोस्ट केला. विशेष म्हणजे अवघ्या पाच मिनिटांतच फोटोमधील तरुणीची ओळख पटली. रिले जॉनसन या तरुणीने हा आपला हरवलेला फोन असल्याचे सांगितले. आठ महिन्यापूर्वी मित्रांसोबत या ठिकाणी फिरायला गेली असताना तिचा फोन हरवला होता. तिचे पती घरापासून नेहमी दूर असल्याने ती नेहमी त्यांचा फोटो आपल्या जवळ ठेवत होती. याच फोटोमुळे मच्छीमाराला फोनच्या मालकापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीचा पाण्यात पडलेला आयफोन तब्बल 6 महिन्यानंतरही चालू स्थितीत असल्याचे समोर आले होते. आयफोन पाण्यात पडल्यानंतरही चालू स्थितीत राहिल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या