आयफोन आता ‘मेड इन इंडिया’, किंमत कमी होणार

31
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयफोन आता ‘मेड इन इंडिया’ होणार आहे. ‘मेक इन इंडिया’ अभियानातंर्गत हिंदुस्थानात लवकरच ऍपलच्या आयफोनची निर्मिती केली जाणार आहे. आयफोनची जोडणी करणाऱ्या फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपने याविषयीचे संकेत दिले असून येत्या वर्षात हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणावर आयफोन तयार होतील, असे फॉक्सकॉनचे संचालक टेरी गोऊ यांनी स्पष्ट केले.

फॉक्सकॉनद्वारे आतापर्यंत चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर आयफोन तयार केले जात होते. पण कंपनीने आता आपल्या पॉलिसीमध्ये बदल केले आहे. मोदी सरकारने आयफोनची निर्मिती करण्यासाठी हिंदुस्थानात आमंत्रित केले असल्याचे गोऊ यांना सांगितले. गेल्या काही वर्षात बंगळुरू येथील एका प्लॉन्टमध्ये ऍपलच्या आयफोनची निर्मिती केली जात आहे. चैन्नईमधून फॉक्सकॉन कंपनी आपले काम सुरू करणार आहे.

चीनमध्ये ऍपलला हुवावे, शाओमीची टक्कर
चीनमध्ये ऍपलला हुवावे आणि शाओमीची जोरदार मुकाबला करावा लागत आहे. हिंदुस्थानातील ऍपलच्या आयफोनची किंमत पाहता ऍपलचे शेअर्स खूपच कमी आहेत. त्यामुळे देशांतर्गत आयफोनची निर्मिती झाल्यास ग्राहकांना कमी किमतीत आयफोन उपलब्ध होऊन ऍपलचे हिंदुस्थानातील मार्केट शेअर्सही वाढण्यास मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या