अखेर धोनीची मैदानात उतरण्याची तारीख ठरली!

1318

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बेस्ट ‘फिनिशर’ असा नावलौकिक असणारा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीची मैदानात उतरण्याची तारीख ठरली आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एक दिवसीय वर्ल्डकपच्या उपांत्याफेरीच्या सामन्यात धोनी खेळला होता. तेव्हापासून तो मैदानात उतरलेला नाही. आता आयपीएलच्या तयारीसाठी धोनी मैदानात उतरणार आहे.

इंडियन प्रीमिअर लिग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन विजेत्या संघांमध्ये होणार आहे. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याच्या हातात असून चेन्नईचे सुपर किंग्जची धुरा धोनीच्या खांद्यावर आहे. बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिल्यानंतर आयपीएलच्या तयारीसाठी धोनी पुन्हा मैदानात उतरणार आहे. धोनी 2 मार्चपासून आयपीएलसाठी सराव करणार असल्याचे माहिती चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, धोनी आयपीएल खेळणारे हे फायनल झाले असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे पुनरागमन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शान करून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याची संधी धोनीकडे आहे. मात्र तरुण खेळाडूंच्या रांगेत धोनीचा नंबर लागेल अथवा नाही हे काळच सांगेल.

आयपीएलमधील कामगिरी
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 2010, 2011 आणि 2018 या हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे. धोनीने 190 लढतींमध्ये 4432 धावा चोपल्या असून यात त्याच्या 23 अर्धशतक ठोकले आहेत. धोनीने यात 297 चौकार आणि 209 षटकार ठोकले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या