आयपीएल-२०१८मधील पुरस्कार विजेत्यांची यादी आणि स्वरूप

19

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी आयपीएल- २०१८चा दिमाखात समारोप झाला. चेन्नई सुपरकिंग्जने ८ विकेट्सने सनरायझर्ज हैदराबादचा पराभव करत आयपीएल-२०१८ च्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. चेन्नईकडून शेन वॉटसनने धमाकेदार शतक ठोकलं. वॉटसनने अवघ्या ५७ चेंडूत ११७ धावांची तुफानी खेळी केली. वॉटसनच्या या खेळीची जोरावर चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद आपल्या नावे केले. सनरायजर्स हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७९ धावांचं आव्हान चेन्नईसमोर ठेवलं होतं. मात्र चेन्नईने हैदराबादचं हे आव्हान अवघ्या १८.३ ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

रविवारी शेवटचा सामना संपल्यानंतर आयपीएलच्या या सीजन सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी ऋषभ पंत, अँन्ड्र्यू टाय, सुनील नरिन, ट्रेंट बोल्टसह अन्य खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

या खेळाडूंना मिळाले पुरस्कार

आयपीएल २०१८ विजेता संघ : चेन्नई सुपरकिंग्ज- २० कोटी रुपये आणि ट्रॉफी
आयपीएल २०१८ उपविजेता संघ : सनरायजर्स हैदराबाद- १२.५ कोटी रुपये
ऑरेंज कॅप : केन विलियमसन- ७५३ धावा (सनरायजर्स हैदराबाद)- १० लाख रुपये आणि ट्रॉफी
पर्पल कॅप : अॅन्ड्र्यू टाय- २४ विकेट (किंग्ज इलेव्हन पंजाब)- १० लाख रुपये आणि ट्रॉफी
स्टार प्लस इनोव्हेटीव्ह आयडिया अॅवॉर्ड : महेंद्र सिंह धोनी (चेन्नई सुपरकिंग्ज) – १० लाख रुपये
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर अॅवॉर्ड : सुनील नरीन (कोलकात नाईट रायडर्स)- १० लाख रुपये आणि ट्रॉफी
एमर्जिंग प्लेयर अॅवॉर्ड : ऋषभ पंत (दिल्ली डेअरडेविल्स) – १० लाख रुपये आणि ट्रॉफी
आयपीएल फेअरप्ले अॅवॉर्ड : मुंबई इंडियन्स – ट्रॉफी
परफेक्ट कॅच ऑफ दि सीजन : ट्रेंट बोल्ट ( दिल्ली डेअरडेविल्स)- १० लाख रुपये आणि ट्रॉफी
सुपर स्ट्रायकर ऑफ सीजन : सुनील नरीन (कोलकाता नाईट रायडर्स)- टाटा नेक्सॉन कार आणि ट्रॉफी
स्टाईलिश प्लेयर ऑफ सीजन : ऋषभ पंत (दिल्ली डेअरडेविल्स) – १० लाख रुपये आणि ट्रॉफी

आपली प्रतिक्रिया द्या