
IPL 2023 चा 51 वा सामना रविवारी गुजरात टायटन्स (GT) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरात संघाला मोठा विजय मिळाला आहे. या सामन्यात लखनौला 56 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात हार्दिक आणि कृणाल हे दोघे सख्खे भाऊ दोन्ही संघांचे नेतृत्व करत होते. मोठा भाऊ कृणाल पंड्या याने नाणेफेक जिंकली, परंतु हा सामना लहान भाऊ हार्दिक पंड्याने जिंकला. लखनौचा हा यंदाच्या मोसमातील पाचवा पराभव आहे. लखनौला सलग चार सामन्यांत गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
वृध्दिमान साहा आणि शुभमन गिल यांनी गुजरात संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी 4 षटकात 53 धावा जोडल्या. रिद्धिमान साहाने अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शुभमन गिलने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. साहाने 81 धावा केल्या. हार्दिक पांड्या 25 धावा करून बाद झाला. शुभमन गिल 51 चेंडूत 94 धावा करून नाबाद परतला. डेव्हिड मिलरने 12 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.
228 धावांचा पाठलाग करताना लखनौला काइल मेयर्स आणि क्विंटन डिकॉक यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या 5 षटकात 64 धावा जोडल्या. काइल मेयर्स 48 धावा करून बाद झाला. दीपक हुडा 11 धावा करू शकला. या मोठ्या सामन्यात स्टॉइनिस अपयशी ठरला. डिकॉकने 71 धावांची खेळी खेळली. निकोलस पूरनही काही विशेष दाखवू शकला नाही. अखेर लखनौला पराभवाला सामोरे जावे लागले.




























































