IPL 2025 – पंजाबचा किंग्जचा दबदबा कायम, अटीतटीच्या लढतीत राजस्थानचा पराभव

हिंदुस्तान-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीनंतर आयपीएल आठ दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. स्थगितीनंतर पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला आहे. पंजाबने दिलेल्या 220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 7 गड्यांच्या मोबदल्यात 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. यशस्वी जयस्वाल (25 चेंडू 50 धावा), वैभव सूर्यवंशी (15 चेंडू 40 धावा) आणि ध्रूव जुरेल (31 चेंडू 53 धावा) यांनी विस्फोटक अंदाजात आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु संघाला विजय मिळवून देण्यात ते अयशस्वी ठरले.