IPL 2026 – राजस्थानचा ‘बर्गर’ CSK वर भारी! वैभव सूर्यवंशीचा तुफानी स्फोट, गायकवाडच्या चेन्नईचा फुसका बार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत चेन्नईला 19.4 षटकांत अवघ्या 127 धावांवर रोखले. नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चेन्नईची फलंदाजी अक्षरशः खिळखिळी केली. अखेरच्या षटकांत ओव्हरटनने 43 धावांची झुंजार खेळी करत चेन्नईला थोडाफार सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवले.

लहान लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने आक्रमक सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीने अवघ्या 17 चेंडूत 52 धावांची तुफानी खेळी करत सामन्याचा निकाल जवळपास एकहाती लावला, तर यशस्वी जायसवालने 36 चेंडूत 38 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. राजस्थानने केवळ 12.1 षटकांत दोन विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठत चेन्नईवर आठ विकेट्सनी विजय मिळवला.