
राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी. वेलरासू यांच्या बदलीची आठवण करून देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. त्यामुळे या पत्रावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी. वेलरासू यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला तरी अद्याप त्यांची बदली झालेली नाही. याबाबत माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्य सरकारला पत्र पाठवले होते, पण काही दिवसांतच त्यांची बदली झाली. आता त्यांच्या जागी नवे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम आल्यानंतर पुन्हा एकदा या बदल्यांसंदर्भात पत्राद्वारे राज्य सरकारला आठवण करून दिली आहे.





























































