Iran Israel War – LPG सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल, गृहिणींच गणित बिघडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेलं युद्ध दिवसेंदिवस अधिक घातक होत चाललं आहे. यामुळे याचे परिणाम आता हळुहळु हिंदुस्थानात दिसण्यास सुरुवात झाली आहे. LPG सिलिंडर देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. सकाळी उठून पाणी तापवण्यासून ते जेवणाचा संपूर्ण स्वयंपाक बनवण्यापर्यंत LPG सिलिंडर हा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील एक मुलभुत घटक आहे. याच LPG सिलिंडरच्या नियमांत मोठा बदल करण्यात आला असून नागरिकांना गॅस वापरताना आता आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे.

घरगुती वापराच्या LPG सिलिंडरच्या बुकिंगच्या नियमांत बदल करण्यात आला आहे. हा नियम दुसऱ्यांदा सिलिंडर बुक करताना लागू असणार आहे. जुन्या नियमांनुसार एकदा सिलिंडर बुक केल्यानंतर नव्याने दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. म्हणजेच 15 दिवसांत संबंधीत व्यक्ती दुसरा सिलिंडर बुक करू शकत होता. मात्र, आता नवीन नियमांनुसार 15 दिवसांचे 21 दिवस करण्यात आले आहेत. म्हणजेत आता एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा सिलिंडर बुक करायचा असेल तर 21 दिवस म्हणजेच जवळपास तीन आठवडे थांबाव लागणार आहे. विशेष म्हणजे हा नियम तात्काळ स्वरुपात लागू करण्यात आला आहे.

या नियमांसंदर्भा गॅस कंपन्यांनी आपली भुमिका स्प्षट केली आहे. त्याचं असं म्हणणं आहे की, LPG सिलिंडरचा पुरवठा सुरळित रहावा म्हणून या नियमाची अंमलबजावणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जेव्हा मागणी अचानक वाढते, तेव्हा पुरवठा प्रक्रियेवर दबाव निर्माण होतो. त्यामुळे बुकिंग कालावधी वाढवून संतुलन राखण्याचा प्रयत्न असल्याचं कंपन्यांच मत आहे.