
पूर्वीच्या काळी जेव्हा चलन अस्तित्वात नव्हतं तेव्हा वस्तुंचा विनिमय करून व्यवहार होत असत. या पद्धतीला इंग्रजीत बार्टर सिस्टिम असं म्हटलं जातं. पण, जेव्हापासू चलन अस्तित्वात आलं, तेव्हापासून सर्व व्यवहार हे पैशांच्या स्वरुपात होतात. मात्र, असं असूनही श्रीलंका आणि इराण या दोन देशांमध्ये झालेल्या बार्टर व्यवहारांची सध्या चर्चा आहे.
इराण या देशाकडून मिळालेल्या इंधन तेलाच्या बदल्यात श्रीलंकेने प्रसिद्ध असला सेयलन चहा देऊ केला आहे. विशेष म्हणजे, इराणनेही चहाचा स्वीकार केला आहे. नऊ वर्षांपूर्वी इराणकडून श्रीलंकेने जे इंधन विकत घेतलं होतं, त्याची किंमत जवळपास 251 मिलियन म्हणजे 18 अब्ज 86 हजार इतकी आहे.
ते कर्ज चुकवण्यासाठी दरमहा सेयलन चहाचे बॉक्सेस पाठवण्यात येत आहेत. इराणनेही या चहाचा स्वीकार केला आहे. अशा प्रकारे श्रीलंका आणि इराणमध्ये व्यापार होऊ शकतो, असा विश्वास संबंधित देशांच्या व्यापार संबंधीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हा व्यवहार राष्ट्रसंघांच्या किंवा अमेरिकेच्या अटींच्या मर्यादेत येतो. कारण, चहा हे अन्न म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही अटी किंवा नियमांचा भंग होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असं श्रीलंकेचे वृक्षारोपण, संवर्धन मंत्री रमेश पथिराना यांचं म्हणणं आहे.





























































