गाझा ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरू केली तर, त्याचे परिणाम वाईट होतील; इराणची इस्रायलला धमकी

इस्रायल आता गाझा पूर्णपणे ताब्यात घेण्याची तयारी करत आहे. इस्रायलचे जवळजवळ अडीच लाख सैन्य गाझाकडे कूच करण्यास सज्ज आहे. दरम्यान, इस्रायलला इराणने मोठी धमकी दिली आहे. इस्रायलने गाझामध्ये कारवाई सुरू केली तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील असे इराणने म्हटले आहे. दुसरीकडे, इस्रायलने गाझा ताब्यात घेण्याची तयारी तीव्र केली आहे.

दरम्यान, इस्रायल गाझावर सतत हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये लाखो गाझा नागरिकांचा बळी गेला आहे. गाझात राहणाऱ्या लोकांची स्थिती खूपच दयनीय झाली आहे. अरब आणि अनेक युरोपीय देशांनी याचा विरोध व्यक्त केला आहे. फ्रान्स आणि ब्रिटननेही इस्रायलचा उघड निषेध केला आहे. दोन्ही देशांनी म्हटले आहे की, इस्रायलचा गाझावर हल्ला चुकीचा आहे. जर हे असेच सुरू राहिले तर ते लवकरच पॅलेस्टाईनला एक राष्ट्र देतील.

असं असलं तरी सध्या तरी याचा इस्रायलवर कोणताही परिणाम झालेला नाही. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली इस्रायली सैन्याने गाझा ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. इस्रायली सैन्य गाझाच्या तोंडावर उभे आहे. पंतप्रधान नेतन्याहू आदेश देताच सैन्य गाझामध्ये कूच करेल. असं बोललं जात आहे की, 15 ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्या बैठकीनंतर इस्रायली पंतप्रधान त्यांचे ऑपरेशन सुरू करतील.