आयआरसीटीसीकडून 3 कोटी फेक अकाऊंट ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआरसीटीसीने रेल्वेतील दलालाविरोधात कडक कारवाई केली असून बनावट अकाऊंटचा वापर करून तिकीट बुकिंग करणाऱया तब्बल 3 कोटी अकाऊंटला ब्लॉक करण्यात आले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत ही माहिती दिली आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वेने अनेक बदल करण्याचे ठरवले आहे. यातील सर्वात मोठे पाऊल म्हणजेच 3 कोटी बनावट अकाऊंट्सला ब्लॉक करण्यात आले आहे. हे दलाल बेकादेशीरपणे तिकीट बुक करत होते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट बुक करण्यात अडचण येत होत्या, परंतु आता 3 कोटी फेक अकाऊंट ब्लॉक केल्याने प्रवासांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढली आहे. तसेच ब्रोकर्सलाही प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.