
हिंदुस्थानचा माजी सर्वोत्पृष्ट अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आगामी पुरुष आशिया कप स्पर्धेत आपली फायनल इलेवन जाहीर केली असून त्यात संजू सॅमसनला संघात संधी दिली आहे. त्याने सॅमसनला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवून त्याच्यावर यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे, अधिपृत निवडकर्त्यांनी जितेश शर्माला पहिली पसंती दिली असताना पठाणने सॅमसनवर विश्वास दाखवला आहे. पठाणच्या अंतिम संघात पंजाबचा अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल यांना सलामीची जबाबदारी दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा, तर चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यपुमार यादव असेल. मध्यक्रमात पाचव्या क्रमांकावर सॅमसन फलंदाजीला उतरेल. इरफानची आशिया कप इलेव्हन ः अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यपुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.


























































