Video : जम्मू कश्मीरमध्ये जामिया मशिदीत फडकवले इसिसचे झेंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरची राजधानी श्रीनगरमधील जामिया मशिदीत फुटिरतावादी नेता मिरवाईज फारुखच्या भाषणानंतर काही तरुणांनी इसिसचा झेंडे फडकविले. हे तरुण चेहऱ्यावर रुमाल बांधून आले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सुरक्षा एजन्सी आता त्या तरुणांचा शोध घेत आहेत.

श्रीनगरमधील नौहट्टा भागात असलेल्या जामिया मशिदीत शनिवारी मिरवाईज फारुखची एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अनेक फुटिरतावादी तेथे जमले होते. मिरवाईजच्या भाषणानंतर तो तेथून जात असतानाच एक फुटिरतावादी तरुण तेथे मिरवाईजसाठी ठेवलेल्या सिंहासनावर चढला व त्याने इसिसचा झेंडा फडकवला. त्यानंतर त्याने इस्लाच्या घोषणाही दिल्या.