‘इसिस’चा नवा खलिफा अबू इब्राहिम

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने आपला नेता अबू बकर अल-बगदादी हा मारला गेल्याच्या वृत्ताला दुजोरा देतानाच अबू इब्राहिम अल हाशिमी अल कुरेशी याला नवा खलिफा म्हणून घोषित केले आहे.

इसिसचा प्रवक्ता अबू हमजा अल कुरेशी याने इस्लामिक स्टेटच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आज एक ऑडियो अपलोड केला. त्यात त्याने नव्या खलिफाबाबत घोषणा केली आहे. या ऑडियोमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख त्यात ‘डोके फिरलेला म्हातारा’ असा करण्यात आला आहे. तसेच यापुढे महाभयंकर हिंसाचार घडवू अशी धमकीही देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या