लहान मुलीला सापडला 1500 वर्ष जुना काटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

इस्राएलच्या गॅलील समुद्राजवळील ज्यू लोकांची वस्ती असणाऱ्या एका प्राचीन गावात उत्खनन करताना अलीकडेच एका लहान मुलीला 1500 वर्षांपूर्वीचा अत्यंत दुर्मिळ काटा सापडला आहे. गोड्या पाण्याच्या सरोवराच्या उत्तरेस काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कोराझिम नॅशनल पार्कमध्ये ताल्मुदिक कालखंडातील अंदाजे 1500 वर्षे जुने ज्यू शहराचे अवशेष या उद्यानात असल्याचे निष्कर्ष काही जाणकारांनी काढले होते.

जुन्या गावांचा शोध लागावा यासाठी अलिकडेच उद्यान प्रशासनाने काही उपक्रमांचे आयोजन केले आहे. जेणेकरुन सामान्य लोकांना गावाचा इतिहास उलगडण्याच्या कामात भाग घेता येईल. वल्हांडण सणाच्या सुट्टीच्या दिवशी अनेक कुटुंबांनी या कामात भाग घेतला होता.

कोरॅझिम येथील एका मुलीने अहिया कोहेन-टाव्हर या इतिहास अभ्यासकांना तिला काहीतरी वेगळीच वस्तू सापडल्याचे सांगितले. यावेळी त्यांना तो 1500 वर्षांपूर्वीचा काटा असल्याचे लक्षात आले. पुरातन भांडी सापडणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी कोहेन-टॅव्हर म्हणाल्या की पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते पूर्वीच्या काळी तेथे सर्वात जास्त वापरले जाणारे भांडे लाकडी चमचे होते मात्र ते टिकले नाहीत. यापूर्वी पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खननात एकही काटा सापडला नाही. त्यामुळे मुलीला मिळालेला काटा हा खूप मौल्यवान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हा काटा ज्या जागेत सापडला ती खोली नेमकी कशासाठी वापरली गेली होती आणि काटा तिथे का सापडला हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. इतरवेळी या ठिकाणी विविध पदके, मातीची भांडी, काचेची भांडी आणि स्थानिकांनी पाळलेल्या प्राण्यांचे अवशेष असलेले कानही सापडले असल्याचे तज्ञ व्यक्तींचे म्हणने आहे.