इस्त्रायलच्या पंतप्रधानांकडून ‘घनिष्ठ मित्र’ मोदी व हिंदुस्थानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशविदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही हिंदुस्थानच्या जनतेला आणि ‘घनिष्ठ मित्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्विटरवर शुभेच्छा संदेशाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

‘माझ्या मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुस्थानच्या जनतेला नमस्कार! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!’, असा शुभेच्छा संदेश पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ट्विटरवर पोस्ट केला आहे. हिंदी आणि इंग्रजीमध्ये त्यांनी हा संदेश दिला आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे फोटो आणि त्यांच्या मैत्रिचे काही क्षण दिसत आहेत.